पिंपरी (Pclive7.com):- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची एक कोटी ३० लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना एक डिसेंबर २०२२ ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.
दीपक अनंत आवटे (३५, रा. महाळुंगे, पुणे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विश्वभूषण वाल्मीक गायकवाड (२४, रा. पिंपरी), कुलभूषण वाल्मीक गायकवाड (२३, रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यासोबत समजूतीचा करारनामा केला. त्यानुसार, फिर्यादी यांना एका बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी आरोपींच्या बँक खात्यावर एक कोटी ३० लाख ३८ हजार रुपये जमा केले.
दरम्यान, आरोपी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करणार होते. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांना ४१ लाख ६५ हजार ३७० रुपये पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांवरील व्याज आणि मुद्दल परतफेड करण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group