पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. आज (दि.१५) दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बिजलीनगरमध्ये वाहनांची तोडफोड केली आहे.
बिजलीनगरमध्ये सायंकाळी दहा ते पंधरा जणांचे टोळके धिंगाणा घालत आले होते. भर रस्त्यात हातात कोयते नाचवत या समाजकंठकांनी हा धुडगूस घातला. पाच ते सहा वाहनांचे यात नुकसान केले आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली असून केवळ दशहत माजवण्यासाठी ही तोडफोड केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने पोलिसांनी दहशत पसरविणाऱ्या या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.