पिंपरी (Pclive7.com):- ॲमेझॉन कंपनीकडील लॅपटॉप, मोबाइल व इतर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वाहतूक करत असताना त्यामधील ४८ लाख रुपयांच्या महागड्या वस्तू लंपास करण्यात आल्या. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ ते १४ मार्च या कालावधीत बंगळुरू ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडला.
तिवारी यांच्या सेंच्युरी कार्गो कॅरियर ट्रान्सपोर्ट फर्ममध्ये संशयित शाहीद कंटेनर चालक म्हणून काम करत होता. तिवारी यांचा विश्वास संपादन करून त्याने बंगळुरू येथून ॲमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाइल, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण १ कोटी ५३ लाख ९३ हजार ३०० रुपयांचा माल भरला. मात्र आंबेठाण येथे आले असता त्यातील ४८ लाख ६९ हजार ९५३ रुपयांचा माल गायब झाला होता.
यावरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनुज सचिव तिवारी (वय २५ रा. वाघोली) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शाहीद इलियास (२५, रा. राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
























Join Our Whatsapp Group