पिंपरी (Pclive7.com):- अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे ही इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्यापासून ते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत. म्हणूनच कदाचित आढळरावांनी लांडेंची भेट घेतली. या भेटीनंतर आढळरावांनी लांडे नाराज नसल्याचं म्हटलं आहे.
उमेदवारी ज्यांना भेटेल त्याचा प्रचार करायचं, असं आमच्या दोघांमध्ये ठरलं होतं. त्यानुसार मला उमेदवारी मिळाल्यानं आता लांडे माझा प्रचार करतील, असा दावा आढळराव पाटील यांनी केला आहे. मात्र विलास लांडे अद्याप त्यांची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केलेली नाही. त्यामुळं ते आढळरावांचा प्रचार करणार का? हा प्रश्न कायम आहे.
काय म्हणाले आढळराव पाटील?
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे सहकारी विलास लांडे यांनी कधीही मला प्रवेशासाठी विरोध केला नाही. ते इच्छुक होते हे मान्य आहे. त्याच्यामध्ये काय गैर नाही पण जेव्हा आमच्या नेत्यांनी, अजित दादांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी प्रवेश आणि उमेदवारी मान्य केली होती. विलास लांडे नाराज असल्याच्या चर्चांना काहीही अर्थ नाही. ज्यावेळी नाराजीच्या बातम्या आल्या त्यावेळी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यांच्या भागात आल्याने त्यांची भेट घेतली आहे. निवडणुकीचं नियोजन कसं करायचं?, प्रचाराचं नियोजन कसं करायचं?, या संदर्भात चर्चा झाली आहे.
Tags: भोसरी विधानसभामाजी आमदार विलास लांडेराष्ट्रवादी काँग्रेसविलास लांडेंची नाराजी दूरशिरूर लोकसभा मतदारसंघशिवाजीराव आढळराव पाटील