पिंपरी (Pclive7.com):- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरून निघालेल्या पोलिस हवालदार सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१५) रात्री साडेदहाच्या सुमारास बंगळुरू – मुंबई महामार्गावर रावेत येथे घडली.
अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. सचिन नरुटे देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नरोटे हे देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तृत्वार असलेले नरोटे रात्री साडेदहाच्या सुमारास पुनावळे येथून देहूरोड पोलीस ठाण्याच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ज्या वाहनाने धडक दिली ते न थांबता निघून गेले. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदार चा मृत्यूदेहूरोड पोलीस स्टेशनपिंपरी चिंचवडरावेत पोलीसरावेत येथील घटना























Join Our Whatsapp Group