पिंपरी (Pclive7.com):- दहावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. अशावेळी दहावीनंतर आता पुढे काय हा प्रश्न सर्वच विद्यार्थी आणि पालकांना पडला असेल.अशा संभ्रमावस्थेत पुढे काय करायचे? कसे करायचे? याबाबत नेहमीच गोंधळाची परिस्थिती असते. विद्यार्थी आणि पालकांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी दहावीनंतर सायन्स, कॉमर्स, आर्टस् मध्ये जसं शिक्षण घेता येतं तसंच अजुन एका नामांकित क्षेत्रात शिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या पाल्याचे भवितव्य घडवू शकता. उद्योगप्रधान आणि कौशल्य विकासावर भर देणारी महाराष्ट्र बोर्डाची Higher Secondary Vocational Courses (HSVC) ही शाखा. या शाखेतील फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम पंचतारांकित करिअरच्या अनेक संधीची कवाड खुली करत आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत HSVC हा चौथा पर्याय निवडून फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम निश्चित करावा. 12 वी पूर्ण झाल्यावर लगेचच स्वतःचा व्यवसाय सुरु करणे सहज शक्य आहे. तसेच हा अभ्यासक्रम महाराष्ट्र शिक्षण मंडळ राबवत असल्यामुळे 12 वी नंतर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम मॅनेजमेंट यामधील पुणे विद्यापीठातून डिग्री करण्याच्या शिक्षणाच्या पुढील संधीही उपलब्ध करून देतो.

रेग्युलर अकरावी बारावी आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीनं बारावीनंतर आपण इतर ठिकाणी प्रवेश घ्यायला या कोर्सच्या माध्यमातून पात्र ठरतात हे या कोर्सचे आणखी एक वैशिष्ट्य.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
नॉव्हेल्स एनआयबीआर कॉलेज, निगडी, पुणे
9881540066
9881520066


























Join Our Whatsapp Group