भोसरी (Pclive7.com):- चोरट्यांनी रस्त्यात अडवून दुचाकीस्वाराला लुटले. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री आल्हाटवस्ती, मोशी येथे घडली. अमोल एकनाथराव नागपूरकर (४१, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागपूरकर हे बनकरवस्ती मोशी येथून दुचाकीवरून घरी जात होते. आल्हाटवस्ती येथे आल्यानंतर समोरून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी नागपूरकर यांना अडवले, ‘तूच सोसायटीचा अध्यक्ष आहे ना. तुझ्यामुळे माझ्या नातेवाइकांना फ्लॅट भाड्याने मिळत नाही’ असे म्हणत त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसका मारून जबरदस्तीने चोरून नेली. तसेच त्यांना हातातील कड्याने मारून जखमी केले. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group