पिंपरी (Pclive7.com):- पीएमपीएमएल बस चालकाला अचानक भोवळ आल्याने बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. आज दुपारी बाराच्या सुमारास देहूरोड जवळील केंद्रीय विद्यालयासमोर ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहाणी झाली नसून चालकासह ८ प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडी-किवळे (एम एच १२, सी एच ३९४६) ही बस निगडीवरून देहूरोडच्या दिशेने जात होती. देहूरोड जवळील केंद्रीय विद्यालयासमोर आल्यानंतर वयस्कर बस चालकाला अचानक भोवळ आली. त्यामुळे बस बाजूला घेतली असता नियंत्रण सुटून बसचे एक चाक रस्त्याच्याकडेला असलेल्या खड्ड्यात गेले. त्यामुळे बस रस्त्याच्याकचेला पलटी झाली. बसमध्ये १५ प्रवासी होते. त्यातील ८ प्रवाशांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली असून चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group