मोशी (Pclive7.com):- मोशी येथील स्पाईन सिटी चौकात रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे मोठा खड्डा निर्माण झाला होता. या खड्ड्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक दुचाकींचे अपघात झाले होते. मुख्य चौकात हा खड्डा असून देखील महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष होत होते. मात्र Pclive7.com कडे तक्रार दाखल होताच, काही तासातच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी हा खड्डा तातडीने बुजवला आहे.

मोशी येथील स्पाईन सिटी चौकात मोठी वर्दळ असते. या चौकातून मोठ्या संख्येने वाहतूक होत असते. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यातच या मुख्य चौकात रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे मध्यभागी भला मोठा खड्डा निर्माण झाला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाले होते. तूर्तास परिसरातील काही जागरूक नागरिकांनी या खड्ड्यामध्ये झाडे लावून वाहन चालकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला होता.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्य रस्त्यावर अशाप्रकारे पडलेल्या खड्ड्यामुळे एखादी मोठी दुर्घटना या ठिकाणी होणार होती. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करावी. अन्यथा एखादी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती.
या खड्ड्याबबत आम्ही आवाज उचलला होता. आमच्या बातमीनंतर अवघ्या १८ तासात आमदार महेश लांडगे यांनी हा खड्डा तातडीने बुजवला आहे. Pclive7.com. अम्म्ही या समस्येची वाचा फोडल्याबद्दल मोशी परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी कोणतीही समस्या असेल, तर आम्हाला कळवावे, मी स्वतः आमदार महेश लांडगे ह्या प्रत्येक समस्येला सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. Pclive7.com यांनी ही समस्या आमच्या समोर आणली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, मात्र आम्ही काही तासातच नागरिकांची ही समस्या सोडवली आहे.– आमदार महेश लांडगे





















Join Our Whatsapp Group