):- दिघी येथील सर्वात जुन्या मंदीरांपैकी एक असलेल्या श्री विठ्ठल मंदीरातील मुर्ती पुर्नस्थापने निमित्त व मंदीराच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त दिघी गावकर्यांच्यावतीने या मंदीरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. मंदीरात प्रवचन, भजन व कीर्तनाचेही कार्यक्रम सुरु आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून संपुर्ण परिसर रोषणाईने दिपुन गेला. हा सप्ताह २८ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
आळंदी-पुणे रोडवर असलेल्या या विठ्ठल मंदीरातील मुर्तीची पुर्नस्थापना करण्यात आली. गुरुवर्य शांती ब्रम्हे मारुती महाराज यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. तर ह.भ.प दामोदर अण्णा ब्रम्हे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी पूजन करण्यात आले. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाची सुरवात करण्यात आली. त्याच बरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री तुकाराम गाथा यांची पालखी मिरवणुकही यावेळी काढण्यात आली. तसेच ह.भ.प गोविंद नेर्लेकर, माणिक मोकाशी, बापुसाहेब डफळ, राजेंद्र घोडके, वसंत मुखेकर आदी प्रवचनकारांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर ह.भ.प मंगेश महाराज मोरे, रोहिदास हांडे, सतिश काळजे, नामदेव लबडे, चंद्रकांत वांजळे यांचे कीर्तनही दिघीकरांना श्रवण करण्यास मिळाले. तर केशवमहाराज टिंगरे, गोविंद नेर्लेकर, आदीनाथ लाड, शंकर शेवाळे यांचे देखील कीर्तन व प्रवचन या महोत्सवात होणार आहेत. या महोत्सवात दिघीतील अनेक भाविकांनी अन्नदान केले आहे. या सप्ताहासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असल्याचे दिघी गावक-यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
संभाजी महाराज मोरे देहुगावकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या महोत्सवात दिघीतील अनेक मान्यवरांनी अन्नदान केले असून, यामध्ये सकाळचा नाष्टा, दुपारची पंगत व सायंकाळची पगंत याचा समावेश आहे. या सप्ताहासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असल्याचे दिघी गावक-यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group