पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय श्रम मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या पंतप्रधान श्रम श्री पुरस्काराचे मानकरी म्हणून एसकेएफ कंपनीत मशीन ऑपरेटर पदावर काम करणाऱ्या बाजीराव सातपुते यांना नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बाजीराव सातपुते हे चिंचवड येथील एसकेएफ कंपनीतील सुरक्षा समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. आपल्या २८ वर्षाच्या नोकरीमध्ये त्यांनी विनाअपघात काम केले आहे. गुणवत्ता वाढ, उत्पादन वाढ, कामगारांची सुरक्षा, कामगारांचे मानसिक व शारीरिक कष्ट कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक सुधारणांची नोंद घेण्यात आलेली आहे.
शून्य अपघात डिपार्टमेंट, मॅग्झीमम काईझन अवॉर्ड, सिल्वर अवॉर्ड, गोल्ड अवॉर्ड, मॅन ऑफ द इयर अवॉर्ड, गुणवंत कामगार पुरस्कार २००७, श्यामची आई सन्मान असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. त्याशिवाय भारतरत्न jrd टाटा पुरस्कार, यशवंत वेणू, यशवंत विठाई, राजुरी येथे झालेले शेतकऱ्यांना बळ देणारे कवी संमेलन इत्यादी कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांचा विशेष सहभाग आहे.






















Join Our Whatsapp Group