भोसरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आजी-माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. भोसरी विधानसभेची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहणार असल्याचा दावा करत पुणे जिल्हा संघाटिका सुलभा उबाळे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाल्या आहेत. आज (दि.१८) त्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार आहेत.

काल अजित गव्हाणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांचे भोसरी हेच प्रभावक्षेत्र असून विधानसभेच्या तिकिटासाठी ते इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी तयारी करत असलेल्या सुलभा उबाळे आणि इतर नेत्यांनी, ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच असल्याचा दावा करत अजित गव्हाणे आणि इतरांचं स्वागत आहे, पण त्यांनी जागेवर दावा करू नये असं म्हटलं आहे.
भोसरी विधानसभा आपल्याकडेच ठेवावी ही मागणी करण्यासाठी सुलभा उबाळे आणि इतर स्थानिक नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाल्या आहेत. आता भोसरी विधानसभेच्या जागेच्या तिढ्याबाबत उध्दव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.






















Join Our Whatsapp Group