पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ३७४ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आज (दि.२५) सकाळी ८ वाजेपर्यंत धरण साठ्यात १४.९८ टक्के इतकी वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ६९.११ टक्के इतका झाला आहे.

बुधवारी पवना धरणात ५४.१३ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र धरण क्षेत्रात आज (दि.२५) सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत ३७४ मि.मी. इतका विक्रमी पाऊस झाला आहे. तर यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत १५९६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकाच दिवसात धरणातील पाणीसाठ्यात १४.९८ टक्के इतकी वाढ होऊन सध्या धरणातील पाणीसाठा ६९.११ टक्के इतका झाला आहे.
अजूनही पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी आज पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.























Join Our Whatsapp Group