पुणे (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले असून तुफान पाऊस सुरु असताना विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी परिसरात घडली आहे.

रात्री तीन वाजेच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. या ब्रिज खाली अंडा भुर्जी स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना पहाटे पाच वाजता उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अजय घाणेकर (25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (18, नेपाळी कामगार) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.























Join Our Whatsapp Group