पिंपरी (Pclive7.com):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा संयोजकपदी भाजपा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
संजय मंगोडेकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचार यंत्रणेची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली.
तसेच, पिंपरी विधानसभा मतदार संघात बुथनिहाय सूक्ष्म नियोजन करून कार्यकर्ता मेळावा, मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीद्वारे पिंपरी विधानसभेत १७००० मतांची आघाडी मिळवून देण्यात त्यांनी मोठी कामगीरी केली. या कामगीरीच्या जोरावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय मंगोडेकर यांच्यावर पिंपरी विधानसभा संयोजक (प्रमुख) पदाची जबाबदारी सोपविली.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून पिंपरी विधानसभा श्रेत्रातील महायुतीचे उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्याचा विश्वास संजय मंगोडेकर यांनी व्यक्त केला आहे.