मावळ (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ९७ टक्के भरले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी तिरंगा विद्युत रोषणाई करत धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पवना धरणातील पाण्याच्या विसर्गावर तिरंगी विद्युत रोषणाई करून तिरंग्याला सलाम करण्यात आला. ‘तिरंगा आमची जान, तिरंगा आमची शान, तिरंगा आमचा अभिमान’, असा संदेश या रोषणाईतून देण्यात आला.

तिरंगा पाणी लहरी पाहण्यासाठी व हे मनमोहक दृश्य मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी पवनानगरवासीयांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. दोन दिवस हे नयनरम्य दृश्य टिपता येणार असल्याची माहिती पवना धरण प्रशासनाने दिली आहे.



















Join Our Whatsapp Group