चिंचवड (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पुणे जिल्हा उद्योजक आघाडीच्या अध्यक्ष पदी श्रीकांत खुळगे यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुणे जिल्हा उद्योजक आघाडीच्या उपाध्यक्ष पदी भगवान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड यांच्या शुभहस्ते त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राकेश सायकर, विनायक जगताप, उदय वाडेकर, मिर्झापुरे आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group