चिंचवड (Pclive7.com):- भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आणि संघर्ष मित्र मंडळाचे २२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संभाजीनगर येथील संघर्ष मित्र मंडळ आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आणि लहान मुलांच्या क्रीडा आणि मनोरंजनात्मक कला स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

समाजात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे गरजू व गरीब आजारी रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मदत म्हणून रक्तदान करण्याचा निर्णय संघर्ष मित्र मंडळाने घेतला. संजीवनी ब्लड बँक यांच्या सहकार्याने मंडळाजवळच रक्तदान शिबिर घेण्याचे ठरविले. या शिबिराला रक्तदात्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या प्रसंगी १११ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला.
या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार अमित गोरखे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शिवसेना नेते योगेश बाबर, भाजपा महिला नेत्या सुप्रियाताई चांदगुडे, शिवसेना नेत्या स्मिताताई सकपाळ, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोंजमगुंडे, प.पु. त्रिकालवंदनीय सद्गुरु सदाशिव शिवचार्य महाराज, गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष शाम मोरे, उद्योजक राजन नायर, राजेंद्र मलतपुरे, संदीप थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मंडळाला सदिच्छा भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मंडळातील सर्वच कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष मयूर सकपाळ, उपाध्यक्ष अमित देशमुख, विक्रम जानुगडे, ऋषिकेश ईल्लाळे, श्रीकांत चव्हाण, संकेत किरपे, मयूर जाधव, पवन येसादे, अमित प्रचंडे, विकी पिंजरकर, रोहित शेलार, सागर कदम, प्रशांत हाडोळे, समर्थ नागठाण, लकी जोशी, सनी मुळे, दीपक चव्हाण, महादेव ईल्लाळे, ओंकार परिस्कर, प्रतीक शिंदे, सचिन हाडोळे व सर्वच कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपला सहभाग नोंदविला.























Join Our Whatsapp Group