चिखली (Pclive7.com):- पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी क्र. ८९ शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली. सखी सावित्री समिती सदस्य पदी निशा यादव यांची नियुक्ती करण्यात आली.

शासनाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्याची सुरक्षा त्यांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याचा उद्देश या समिती स्थापन करण्यामागचा आहे. त्याप्रसंगी सौ. निशा यादव व डॉ. सुजाता यादव, सौ. गायकर मॅडम चौधरी मॅडम, महिला पालक आश्विनी कांबळे व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. संपत पोटघन यांनी समितीची रूपरेषा, कार्य व उपाययोजना यांची माहिती दिली. जेणेकरून शालेय वातावरण आनंदी, सुदृढ व भीतिमुक्त राहील आणि सर्व विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण मिळेल. समितीची दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मिटींग घेण्याचे ठरले. समिती मध्ये महिला शिक्षक, महिला पालक, विद्यार्थिनी, महिला डॉक्टर व स्थानिक महिला व सचिव म्हणून मुख्याध्यापक यांचा समावेश करण्यात आला.























Join Our Whatsapp Group