पिंपरी (Pclive7.com):- सासऱ्याच्या नावावर कर्ज काढण्यास भाग पाडून जावयाने त्यांची ८३ लाख ६८ हजार ८६५ रुपयांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०१९ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत निगडी येथे घडली. चेतन दत्तात्रय मोरे (३० रा. जांभूळवाडी रोड, विठ्ठलवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पूजा चेतन मोरे (३१, रा. दुर्गामाता हौसिंग सोसायटी, निगडी) यांनी गुरुवारी (दि. २२) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पूजा आणि आरोपी चेतन मोरे यांचा पहिला विवाह झाला होता. मात्र, तरीही आरोपीने कायदेशीर घटस्फोट न घेता फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांपासून ती बाब लपवून ठेवली. दरम्यान, फिर्यादी पूजा यांच्या सोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला. त्यानंतर फिर्यादी यांना नांदायला नेले नाही.
तसेच, व्यवसाय सुरू करण्यासाठी फिर्यादी आणि तिच्या वडिलांकडून वारंवार कर्ज काढून ८३ लाख ६८ हजार ८६५ रुपयांचे कर्ज काढण्यास भाग पाडून फसवणूक केली. दरम्यान, आणखी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ, मारहाण केली. तसेच, नांदायला घेऊन जाणार नाही, अशी धमकी दिली.























Join Our Whatsapp Group