पिंपरी (Pclive7.com):- गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे आज (दि.७) पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. पारंपरिक वाद्यांचा नाद अन् आकर्षक मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये गणपती बाप्पा अतिशय दिमाखात विराजमान झाले. शहरातील विविध भागात गणेश मंडळांनी मिरवणूक काढत बाप्पांची प्रतिष्ठापना केली. यावेळी काही भागांत वरूणराजानेही हलक्या सरींची बरसात करून बाप्पांचे स्वागत केले.

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरोघरी गणेशोत्सव उत्साहात सुरू झाला आहे. गणेशभक्तांना सकाळपासूनच गणरायाच्या आगमनाची उत्सुकता होती. लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच स्टाॅल्सवर गर्दी झाली होती. स्टॉल्सवर आरती करून प्रत्येक जण आपल्या घरी गणराय घेऊन जात होते. सर्वत्र ‘मोरया मोरया’चा गजर निनादत होता. मंगलमय वातावरणात भाविकांनी आपापल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना केली, तर सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली. पिंपरी गावात अनेक मंडळांच्या आकर्षक मिरवणूक रात्री जल्लोषात सुरू होत्या.






















Join Our Whatsapp Group