सांगवी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक पोपट जम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

पोपट जम हे सांगवी पिंपळेगुरव भागातून २००२ ते २००७ दरम्यान महापालिकेवर निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडून आले होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) सकाळी ११ वाजता सांगवीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






















Join Our Whatsapp Group