चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघाची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार की ठाकरे यांच्या सेनेला मिळणार? याची चर्चा रंगली असताना आता या मतदारसंघावर काँग्रेसने सुद्धा दावा केला आहे. जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांबरोबरच नव्या दमाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी ताकद चिंचवड विधानसभा मतदार संघात आहे. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा, अशी मागणी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत या मागणीवर पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. तसेच या मागणीचे निवेदन हे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे.
एकेकाळी काँग्रेसच्या हातात पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता होती. शहराच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. आजमितीस शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या अनेक जुन्या जाणत्या व नव्या दमाच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे प्राबल्य आहे. सांगवी या ठिकाणी सौरभ शिंदे, विरेंद्र गायकवाड, रोहित शेळके, कुंदन कसबे, मिलिंद फडतरे नवी सांगवी येथे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचा मोठी संख्या आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या ठिकाणी काँग्रेसला माननारा मोठा मतदार संघ आहे. पिंपळे निलख येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव पृथ्वीराज साठे, वंदना साठे, आहेत. वाकड गावात काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. रहाटणी- काळेवाडी या ठिकाणी महिला अध्यक्ष सायलीताई नढे, नंदाताई तुळसे आहेत. चिंचवड ब्लॉकचे अध्यक्ष ते ज्ञानेश्वर मलशेट्टी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव चंद्रशेखर जाधव, सरचिटणीस सचिन कोंढरे, थेरगाव येथील वैभव किरवे, परशुराम गुंजाळ, चिंचवडगाव, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, निखील भोईर, संदीप शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मा. सरचिटणीस मयुर जेसवाल, युवक काँग्रेस प्रवक्ता गौरव चौधरी, पिंपरी चिंचवड शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी ब्लॉक कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, युसुफ बागवान, वाल्हेकरवाडीत भरत वाल्हेकर, दिसलेताई, रावेत येथे माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, सेवादलाचे अध्यक्ष किरण खाजेकर, किवळे- राऊत मॅडम, प्रियंका कदम, राजु ठोकळ, शाम भोसले असे अनेक कार्यकर्ते संच चिंचवड विधानसभा मतदार संघात येत आहे. याशिवाय या सर्व पदाधिकाऱ्यांची नातीगोती या मतदार संघात आहेत. शहराच्या ग्रामीण भागातही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला या मतदार संघातील उमेदवारी ही नवसंजीवनी ठरू शकते. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे आहेत इच्छुक..
इतर पक्षांप्रमाणे काँग्रेसमध्ये देखील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची मोठी यादी असल्याचे दिसून येत आहे. माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, संदेश नवले, भरत वाल्हेकर, शहराध्यक्ष कैलास कदम, महिला शहराध्यक्षा सायली नढे, निखील भोईर, राजाभाऊ गोलांडे, कौस्तुभ नवले यांची नावे चर्चेत आहेत.