मुंबई (Pclive7.com):- अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याने त्याला पायाला दुखापत झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
परवानाधारक बंदुकीचा ट्रीगर अनावधानाने दाबला गेला, त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटली. ती गोविंदाच्या पायाला लागली. जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो सुखरूप असल्याचे समजते. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.
गोविंदा जुहू बंगल्यावर एकटाच असताना ही घटना घडली. पहाटे ४:४५ वाजता घरातून घाईगडबडीत निघताना हा प्रकार घडला. त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीमधून सुटलेली गोळी लागल्याची प्राथमिक महिती आहे. याप्रकरणी कोणाचीही तक्रार नसून सध्या गोविंदा यांच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याजवळील बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे.