पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावातील शशिकांत सोपानराव वाघेरे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज पहाटे निधन झाले, ते G.K.N. SINTER METALS PVT. LTD कंपनी मध्ये गेली ३० वर्षे काम करत होते. तसेच गेली १५ वर्षे ते कामगार युनियनचे पदाधिकारी होते, त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी, नातवंडे व भाऊ असा परिवार आहे, त्यांचे वय ६२ वर्षे होते. आज सकाळी ११.०० वाजता पिंपरीगावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे ते चुलते होते. तर शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष वाघेरे यांचे ते वडील होते. गुरूवार दि.२९ मार्च रोजी सकाळी पिंपरीगावातील पवना नदीच्या घाटावर दशक्रिया विधी होणार आहे.




















Join Our Whatsapp Group