चिंचवड (Pclive7.com):- भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकसित व्हावा आणि त्यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी माजी राज्यसभा खासदार व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे यांनी आज शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर चिंचवड येथील श्री मोरया गोसावी गणपतीला अभिषेक करत साकडं घातलं आहे.
यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार अमर साबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ फडणवीस साहेबांनी विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक अभूतपूर्व विजय संपादन केलेला आहे. या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणीस साहेबच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणीस साहेब विराजमान झाले पाहिजेत. त्यांच्या हातून महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे. तसेच त्यांना दीर्घायुष्य प्राप्त झाले पाहजे, या पवित्र भावनेने मोरया गोसावी मंदिरातील गणरायाला आम्ही साकडं घातलं आहे.