पुणे (Pclive7.com):- राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या आरोपावरून चंदननगर पोलिसांनी वडापाव विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. महेश आनंदराव कदम (वय ४८, रा. मतेनगर, वडगाव शेरी) यांनी याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, वडापाव विक्रेत्यावर राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायद्यानुसार कलम २ (जी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वडापाव विक्रेता वडगाव शेरी येथे राहतो आणि तेथेच त्याची वडापाव विक्रीची गाडी असते. रविवारी (२६ जानेवारी) सकाळी दहा वाजता महेश कदम वडापाव खाण्यासाठी तिथे गेले होते. विक्रेत्याने राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या कागदात वडापाव गुंडाळून दिला. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी विक्रेत्याला जाब विचारला आणि नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.






















Join Our Whatsapp Group