प्रयागराज (Pclive7.com):- उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर आज (बुधवार) मौनी अमावस्येला पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले आहेत. दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास संगमावर गर्दी इतकी मोठी झाली. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे पवित्र स्नान आहे. यानिमित्त मोठ्या संख्येने संगमावर लोक आले आहेत. यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे चेंगराचेंगरी झाली. संगम किनाऱ्यावर रात्री २ वाजताच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगगरीत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तेथे उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकांद्वारे महाकुंभ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याची सुरूवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर येत आहेत. सरकारचा अंदाज आहे की, यावर्षीच्या महाकुंभमेळ्याला ४० कोटीहून अधिक लोक भेट देणार आहेत.






















Join Our Whatsapp Group