पिंपरी (Pclive7.com):- धारदार शस्त्राने वार करून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.२) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पाटीलनगर, चिखली येथे उघडकीस आली. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सागर सुभाष देवकर (वय ३५) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून तो अंगाने सडपातळ, अंगात चॉकलेटी रंगाचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, छातीवर धनश्री असे मराठीत गोंदलेले आहे.
अज्ञात आरोपीने त्याच्या डोक्यात व मानेवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला. तसेच मयताची ओळख पटु नये म्हणून त्याचा चेहरा, डोके कशाच्या तरी सहाय्याने विद्रुप करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

























Join Our Whatsapp Group