मोशी (Pclive7.com):- मोशी येथे ‘पकवान फूड ट्रॅडिशन’ या प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा (दि.६) मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सुपुत्र आणि युवा नेते पार्थ पवार, महाराष्ट्र राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते , भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.

मोशी परिसरामध्ये खवय्यांसाठी राजस्थानी पारंपरिक चवी सोबतच महाराष्ट्रीयन, पंजाबी चविची अनुभूती देणारे असे प्रशस्त पार्किंगची सोय देणारे तसेच 200 लोकांची AC हॉल मध्ये बैठक व्यवस्था तसेच फॅमिली साठी स्वतंत्र अशी 70 लोकांची बैठक व्यवस्था सोबतच प्रशस्त असा पार्टी हॉल अशा अनेक प्रकारच्या सुख सोयियुक्त अद्यावत पकवान फूड ट्रॅडिशन restaurant आपल्या सेवेत रुजू झाले आहे.
