पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश सरचिटणीस पदी मनोज ब्राह्मणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी ही नियुक्ती केली असून त्यांच्या हस्ते ब्राह्मणकर यांना नियुक्तीपत्र प्रदान देण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, ही जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे. ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ओबीसी भाजपामध्ये सामील करण्यासाठी अथक परिक्षम कराल असा विश्वास आहे. आपल्या नियुक्तीबद्दल व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.






















Join Our Whatsapp Group