पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल आयोजित ‘पीडीसीसी’ च्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत नऊ आणि अकरा वर्षाखालील मुलींच्या गटात पिंपळे सौदागरची कन्या ‘शालवी चासकरने’ प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी शालवीचा ट्रॉफी देऊन सत्कार केला.

यावेळी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर मधील लहान मुले तसेच युवा वर्ग क्रीडा प्रकारात करत असलेली प्रगती एक खूप समाधानाची बाब आहे. त्यांच्या खेळाडू वृत्तीला अजून चालना देण्यासाठी एक लोकसेवक या नात्याने सदैव प्रयत्नशील राहणार आहे. तसेच प्रभागातील विविध खेळात पारंगत असलेल्या खेळाडूंना एक सकारात्मक दृष्टीने पुढील वाटचाल सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणार आहे.
शत्रुघ्न काटे यांनी शालवी चासकर हिचे आई वडील यांचे विशेष अभिनंदन केले. आपल्या पाल्यांना त्यांच्या आवडत्या खेळात सहभाग घेण्यापासून मज्जाव न करता त्यांना आपला पूर्ण पाठिंबा देऊन त्यांचे मनोधर्य उंचावणे हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली असते. क्रिकेट, फूटबॉल यासारख्या खेळाचा बोलबाला असताना देखील बुद्धिबळ सारखा माइंड गेम निवडल्याबद्दल तसेच मेहनतीने यश संपादन करणाऱ्या शालवी चासकरला शुभेच्छा दिल्या.





















Join Our Whatsapp Group