पिंपरी (Pclive7.com):- आढले खुर्द (ता. मावळ) गावातील राजकारणाबाबत बोलला म्हणून एकाने त्याच्या चुलत भावाच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्याला जखमी केले. ही घटना रविवारी (दि.९) रात्री दीडच्या सुमारास वाकड येथील संयोग रेस्टॉरंट अँड बार येथे घडली.

संतोष नामदेव येवले (४६, रा. थेरगाव) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सतीश संभाजी येवले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संतोष हे जेवण करण्यासाठी वाकड येथील संयोग रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलमध्ये गेले होते.

दरम्यान, संतोष यांचा चुलत भाऊ सतीश येवले याने आढले खुर्द गावातील राजकारणाबाबत का बोलला, असे म्हणून संतोष यांना शिवीगाळ करत मारहाण केली. टेबलवरील दारूची बाटली संतोष यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली.





















Join Our Whatsapp Group