

नेमकं काय घडलं होतं..?
म्हाळुंगे येथे झालेल्या गोळीबाराने वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. चुलत भावाने भावाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर पोलीस तपासातून पुढे आली आहे. कौटुंबिक वाद आणि व्यावसायीक ईर्षेतून त्याने ही सुपारी दिली होती. संग्रामसिंग असं सुपारी देणाऱ्या चुलत भावाचे नाव असून त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी चौघांना सुपारी दिली होती. हत्येच्या उद्देशाने कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजय सिंगवर गोळीबार झाला होता. अजय त्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडेला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केल्यावर आता नवी माहिती समोर आली आहे. याप्रकरणात चक्क चुलत भावाचे बिंग फुटले. अजय आधी संग्रामकडे कामाला होता, अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेचं आणलं होतं. मात्र, अजय मोठा होऊ लागला, हे संग्रामला पचत नव्हतं. त्यातून संग्रामने अजयची सुपारी दिली अन् सगळा प्रकार घडला. या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला होता. पिंपरी चिंचवड पोलीस काय-काय तपास करतायेत, याचीही माहिती तो घेत होता. मात्र, अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचं उघडकीस झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान, हे ऐकून अजयला मात्र विश्वास बसेना. मी ज्याला आदर्श मानत होतो, तोच माझ्या जीवावर उठला. हे उघडकीस आल्यावर अजयला मोठा धक्का बसला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-१, विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पी.पी. तापकीर, एस.एन. ठोकळ, व्ही.एच. जगदाळे, ए. पी. गायकवाड, पोलीस हवालदार जी.डी. चव्हाण, एस. डी. चौधरी, व्ही टी. गंभीरे, जी.एस. मेदगे, एस.पी. बाबा, एन थी. गेंगजे, व्ही.डी. तेलेवार, पोलीस शिपाई व्ही. एन. वेळापुरे, आर. के. मोहीते, एस.टी. कदम, टी.ई. शेख यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group