पिंपरी (Pclive7.com):- प्रेमसबंधातून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने ताथवडे येथे १५ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रियकर प्रणव डोंगरेला अटक करण्यात आली आहे. सहिता रेड्डी असं आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव होतं. सहिता आणि प्रणव दोघे ही एकाच नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सहिताने ताथवडे येथे राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावर जाऊन उडी घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी सहिताने ४२ मिनिटांची व्हॉइस नोट बनवून तिच्या मैत्रिणीला पाठवली होती. पण मैत्रिणीच्या व्हाट्सअपला दोन तासानंतर व्हॉइस पोहचेल अशी व्हाट्स सेटिंग करून सहिता रेड्डीने १५ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी पोहचले होते. परंतु, भीतीमुळे सहिताने सुसाईड व्हाईस नोट पाठवली आहे हे तिच्या मैत्रीने पोलिसांना सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांना मैत्रिणीने सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर वाकड पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास करून सहिताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अखेर या प्रकरणी प्रणव डोंगरेला १३ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. प्रणव हा वारंवार सहिताला प्रेमबंधावरून मानसिक त्रास द्यायचा, शारीरिक छळ करायचा, मी तुझ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडेल अशी धमकी देत असायचा. पण पुढे तो तेवढंच जास्त प्रेम करायचा असा उल्लेख सहिताने व्हाईस नोट मध्ये केला होता.























Join Our Whatsapp Group