पिंपरी (Pclive7.com):- प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी महाराष्ट्राचा बिहार होणार का, अशी शंका जनसामान्यांच्या मनात येऊ लागली आहे. कधी काळी नागपुर शांत शहर म्हणून ओळखले जायचे. परंतू गेल्या काही वर्षात नागपूरची कायदा व सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात बिघडली आहे. मुख्यमंत्र्यांचे होम टाऊन असणारे नागपूर हे गुन्हेगारांचे होम टाऊन होत चालले आहे,अशी टिका पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नागपुरमध्ये खून, चो-या, गँगवार, लुटमार, बलात्कार अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत.दिवसें-दिवस नागपुरमध्ये भयावह घटना घडण्याचा आलेख वाढतच चालला आहे. यामुळे नागपुरची ओळख हि असुरक्षित शहर म्हणून होत आहे. नागपुर हे मुख्यमंत्र्यांचे होम टाऊन आहे, गृहखाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असुन देखील ते नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यास असमर्थ ठरले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाली आहे. २०१६ मध्ये देशात सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवले गेले. त्यानंतर क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. देशभरात नोंदवलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी ८.८ टक्के गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. यातून स्पष्ट होते की, महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्याला स्वतंत्र पुर्णवेळ गृहमंत्री असला पाहिजे, हे आता अधोरेखित होत आहे असे बच्छाव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचे होम टाऊन होतेय गुन्हेगारांचे होम टाऊन; राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांचे टिकास्त्र






















Join Our Whatsapp Group