पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरासह परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर चालक व मालकांनी पाण्याच्या दरात वाढ न करता नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन भाजपा पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष रामभाऊ हनुमंत वाकडकर यांनी केले आहे.

कडक उन्हाळा, आटलेल्या बोरवेल, अपुरा पाणीपुरवठा आणि लांबलेल्या पावसामुळे हजारो कुटुंबांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाणी ही केवळ गरज नसून जीवनावश्यक बाब बनली असल्याचे वाकडकर यांनी म्हटले आहे. टँकर व्यवसाय चालविताना वाढलेले खर्च आणि विविध अडचणी असल्याची जाणीव असल्याचे सांगत त्यांनी, सध्याच्या गंभीर परिस्थितीत दरवाढीचा अतिरिक्त भार सामान्य नागरिकांवर टाकू नये, अशी नम्र विनंती केली आहे.

“नफ्यापेक्षा माणुसकी मोठी असते. संकटाच्या या काळात नागरिकांना सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपावी. पावसाचे दिवस जवळ आले असून तोपर्यंत सर्वांनी मिळून ही परिस्थिती सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले.

“पाणी विकू नका, माणुसकी जपा,” असा संदेश देत टँकर चालक, मालक आणि संबंधित व्यावसायिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून नागरिकांच्या मदतीला धावून यावे, असेही वाकडकर यांनी म्हटले आहे.




















Join Our Whatsapp Group