पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘पोलीस आयुक्तांची भेट’ या उपक्रमाच्या दिवस आणि वेळेत प्रशासकीय कारणास्तव पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. आता हा उपक्रम सोमवार ऐवजी दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.

हद्दीतील नागरिकांना आणि तक्रारदारांना थेट पोलीस आयुक्तांना भेटून आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना मांडता याव्यात, यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले जाते. यापूर्वी या उपक्रमाच्या वेळेत दोनदा बदल झाले आहेत. सुरुवातीला हा उपक्रम दर सोमवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत होत होता, त्यानंतर तो दुपारी ३ ते ५ असा करण्यात आला.

आता नागरिकांच्या सुविधेसाठी आणि प्रशासकीय कारणांमुळे यात तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. आता हा उपक्रम दर शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजताच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२२ जून) रोजी जनसंवाद हा उपक्रम होणार नाही. त्याऐवजी शुक्रवारी (दि.२६ जून) रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत आणि त्यानंतर सर्व शुक्रवारी याच वेळेत होणार असल्याचे जनसंपर्क विभागाने कळविले आहे.





















Join Our Whatsapp Group