पिंपरी (Pclive7.com):- रहाटणीच्या गजानन नगर येथील ए कॉलनी परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने रस्त्यावर सांडपाणी वाहत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर या समस्येची तात्काळ दखल घेत ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दुरुस्तीच्या कामावेळी ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता धनाजी नखाते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

दरम्यान, लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने ड्रेनेज व्यवस्था सुरळीत राहावी, पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




















Join Our Whatsapp Group