
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- २१ जून हा दिवस भारतात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. नाना काटे सोशल फाऊंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग पिंपळे सौदागर यांच्या वतीने दरवर्षी कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर येथे सामुहिक योग शिबिराचे आयोजन केले जाते.

यावर्षी देखील २१ जून २०२६ रोजी या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात परिसरातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, शारिरीक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनमूल्ये समाजात रुजविण्याचा या शिबाराचा उपक्रमामागील मुख्य उद्देश असतो.

भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असलेल्या योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून आज योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून संपूर्ण जीवनशैली बनला आहे. वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता नियमित योग अभ्यासाची गरज अधिक अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माघ्यमातून नागरिकांना योगाशी जोडण्याचा संकल्प दरवर्षी केला जातो.

यावेळी नाना काटे म्हणाले की “योग ही भारताने जगाला दिलेली महान देणगी आहे. प्रत्येक नागरिकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून निरोगी आयुष्यासाठी योगदान द्यावे. या कार्यक्रमावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे दत्ता आलेकर, निशा लुल्ला, उमा कुलकर्णी, शशांक खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल काटे, उमेश काटे, काळुराम कवितके, संतोष मस्कर, संतोष मिश्रा, रवि मुंढे, विनोद सुर्वे, अमरिश जोशी, संदेश घाटे, जयेश सरोदे, दिपक काळे, सतिश डोगंरे, चेतन पाटील, विलास काका जोशी, व परसिरातील सोसायटी मधील नागरिक मोठ्या संख्यंने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group