पिंपरी (Pclive7.com):- कंजारभाट समाजात विवाह ठरविल्यानतंर विवाहादरम्यान कौमार्य चाचणी केली जाते. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरा आजही सुरू आहेत. मात्र, त्याच समाजातील तरुणांना ही चाचणी मान्य नसल्याने त्यांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती. अशाच प्रकारे कांजारभाट समाजातील एका तरुणाने चक्क स्वत:च्या लग्नपत्रिकेतून या कौमार्य चाचणीच्या प्रथेविरोधात आवाज उठविणारा संदेश दिला आहे. पिंपरीतील काळेवाडी येथे हा लग्न सोहळा आज संपन्न झाला.
विवेक तायमाचीकर असे त्या कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी विरोधात जनजागृती करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विवेकने लग्न पत्रिकेच्या माध्यमातून जातपंचायत, कौमार्य चाचणी विरोधात संदेश प्रसारित केला होता.
कंजारभाट समाजात आज ही कौमार्य चाचणी केली जाते. पण त्याचा गाजावाजा होत नाही. याला विरोध करण्यास समाजातील एकही कुटुंब पुढे येत नाही. या परंपरेला विरोध करणाऱ्यांना कंजारभाट समाजाकडून वाळीत टाकले जाते. त्यामुळे भिती पोटी कौमार्य चाचणीची परंपरा अद्याप सुरूच आहे.
मात्र काळाच्या प्रवाहासोबत विकासाच्या प्रवाहात आलेल्या आणि तंत्रज्ञानाच्या जगात वावरणाऱ्या या समाजातील तरुणांनी या कौमार्य चाचणी विरोधात एल्गार पुकारला आहे. ही प्रथा बंद पाडावी यासाठी आता समाजातील लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विवेक तायमाचीकर यांचे आज शनिवार दिनांक १२ मे ला पिंपरी परिसरातील काळेवाडी येथे बालाजी लाँन परिसरात लग्न संपन्न झाले आहे. हीच संधी साधत विवेकने कौमार्यचाचणी विरोधाचे प्रचार स्वत:च्या लग्न पत्रिकेतच्या माध्यमातून करण्याचे ठरवले होते.
विवेकने लग्नपत्रिकेत प्रबोधनपर संदेश लिहीला होता. याबद्दल समाजातही आश्चर्य व्यकत केले जात होते. विवेकला ही कौमार्य चाचणी बंद करण्याकरता अनेक अडचणीना सामोरे जावे लागले होते. विवेच्या मावशीच्या मुलीची कौमार्य चाचणी काही दिवसांपूर्वी पंचायत लोकांसमोर करण्यात आली होती. त्यावेळी या मुलांनी त्याचे चित्रीकरण करुन माध्यमांना दिले होते. याबद्दलची माहिती समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना लागताच विवेक तायमाचीकर याला मारहाण करण्यात आली होती. शिवाय त्याला जिवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणीची दखल राज्य सरकारनेसुध्दा घेतली होती. त्यानंतर याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले होते.
अखेर विवेकने ही प्रथा बंद करण्यासाठी आता पावले उचलली. त्याने त्याच्या लग्न पत्रिकेच्या माध्यमातून ही कौमार्यचाचणीबद्दल जनजागृती सुरू केली आहे. याबद्दल नागरिकांमधून आश्चर्यपेक्षा सर्वत्र कौतुकही केले जात आहे.






















Join Our Whatsapp Group