पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सचिन चिखले यांच्यावर सोपविण्यात आली. पूर्वी शहरात दोन शहराध्यक्ष होते. मात्र आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार एकच शहराध्यक्ष असणार आहे. मुंबईत ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी झालेल्या बैठकीत चिखले यांच्या जबाबदारी सोपविण्यात आली.
महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचे दोन शहराध्यक्ष निवडण्यात आले होते. त्यात सचिन चिखले आणि कैलास जाधव यांची निवड करण्यात आली होती. मात्र जाधव हे पक्षाच्या कोणत्याच प्रक्रीयेत सक्रीय होत नव्हते. त्याच्या परिणाम पक्षावर झाला. महापालिका निवडणुकीत अवघा एकच नगरसेवक निवडूण आला. सचिन चिखले यांच्या रूपाने मनसेची पालिकेच एंट्री झाली. गेल्या वर्षभरात चिखले यांनी विविध आंदोलने तसेच अनेक समस्यांना वाचा फोडली. पक्षसंघटन, शाखा उभारणीत चिखले यांनी मोठे योगदान दिले. त्याचीच दखल घेत राज ठाकरे यांनी संपूर्ण शहराची जबाबदारी आज चिखले यांच्यावर सोपविली.



















Join Our Whatsapp Group