पिंपरी (Pclive7.com):- चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ग्रेडसेपरेटरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी पाचच्या सुमारास पिंपरी ग्रेडसेपरेटर येथे झाला.
शिवम जाधव (वय ३८) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालक तरुणाचे नाव आहे. तर हृषीकेश पवार गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडून पुण्याच्या दिशेने एक मारुती एस एक्स ४ (एम एच ०४ / ए डी ८४६१) कार भरधाव वेगात जात होती. कार पिंपरी ग्रेडसेपरेजटजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकावरील पोलला धडकली. कार वेगात असल्याने कार दुभाजकावरून सुमारे ५०० मीटर घसरत गेली. या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गाडी कापून कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group