पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने वर्षभर अनागोंदी कारभार केलाय. त्यांच्या प्रत्येक चुकीच्या कामांना विरोध करत पोलखोल करणार असल्याची प्रतिक्रीया दत्ता साने यांनी दिली. महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची सुत्रे दत्ता साने यांनी आज स्विकारली. महापौर नितीन काळजे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या वतीने नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर साने यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, जावेद शेख, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विनया तापकीर, प्रज्ञा खानोलकर, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.
दत्ता साने म्हणाले, पिंपरी महापालिकेत एक वर्षापूर्वी भाजपाची सत्ता आली. या काळात महापालिकेत बराच अनागोंदी कारभार सुरू आहे. या सर्व कारभाराची पोलखोल करणार असून प्रत्येक चुकीच्या कामा विरोधात आवाज उठवणार आहे. याबाबत उद्या शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडणार आहे.
पुढे साने म्हणाले की, मी दररोज महापालिका कार्यालयात हजेरी लावणार आहे. पूर्णवेळ या पदाला न्याय देण्याचे काम करणार आहे. विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून नाना काटे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पक्षाची भूमिका सभागृहात मांडणार आहे.






















Join Our Whatsapp Group