पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाची आरती करून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार विक्रांत पाटील यांनीही उपस्थित राहून गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेत उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत काटे परिवाराने महसूल मंत्री बावनकुळे यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शहरातील विकासकामे, भाजप पक्षसंघटना आणि विविध स्थानिक विषयांवरही चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे आमच्या निवासस्थानी आगमन होणे आणि त्यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती संपन्न होणे, हा आमच्या संपूर्ण काटे परिवारासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी दिलेली भेट आणि शहराच्या संघटनात्मक बाबींवर केलेले मार्गदर्शन आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात झालेल्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सौहार्द, एकजूट आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group