चिखली (Pclive7.com):- श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त कुदळवाडी येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे मानाच्या गाड्याचे पूजन कार्यक्रम टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या हस्ते भक्तिभावात केला जातो. त्या पार्श्वभूमीवर श्री भैरवनाथ मंदिर परिसरात दुरुस्तीची कामे तसेच यात्रेच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. या कामासाठी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी पुढाकार घेतला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी यात्रा ही चिखली गावात भरते. हजारो भाविक हनुमान जंयतीच्या दिवशी कुदळवाडी येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे दर्शन करण्यासाठी येतात.

श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव लवकरच सुरू होणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त नंदी स्वरूप बैलगाडा पूजनाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला जातो. सदर मानाचा गाडा पूजन कार्यक्रम हा यात्रा उत्सवातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो.

चिखली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे परंपरेनुसार विधिवत पूजन केले जाते. याप्रसंगी स्थानिक मान्यवरांसह, यात्रा कमिटीचे सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. या सर्व गोष्टीचा विचार करून स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी बैलगाडा घाटात मुरूम टाकून सपाट करणे, सीमा भिंती पेंटिंग करणे, मंदिर परिसरात साफसफाई करणे, सर्व स्ट्रीट लाईट सुरू करणे ही कामे सुरू केली आहेत. यात्रा कमिटीने दिनेश यादव यांच्याकडे दिलेली जबाबदारी ते चोखपणे पार पाडत आहेत.






















Join Our Whatsapp Group