आळंदी (Pclive7.com):- चऱ्होली-खुर्द परिसरातील एका बंद घरात घुसून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि एलईडी टीव्ही असा एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम उज्जैन देवकर (वय २६) यांच्या चऱ्होली खुर्द येथील राहत्या घराबाहेरील लोखंडी ग्रील व दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने तसेच हायर कंपनीचा एलईडी टीव्ही असा एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडली असून फिर्यादीने ३१ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली.

या प्रकरणात रणजित अशोक भिसे (वय ३१) याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार वहिल हे करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group