वाकड (Pclive7.com):- वाकड येथील एका व्यक्तीला कॅनडा देशात नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून वेळोवेळी २१ लाख २२ हजार रुपये घेत नोकरी न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ३१ डिसेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वाकड येथे घडली.
अनिरुद्ध अनिल थरवल (३६, वाकड) यांनी याप्रकरणी २७ एप्रिल २०२५ रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अनिरुद्ध यांच्याशी इंस्टाग्राम वरून संपर्क केला. त्यांना कॅनडा देशात नोकरी देण्याचे अमिष दाखवले. नोकरी मिळविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने अनिरुद्ध यांच्याकडून २१ लाख २२ हजार ६०९ रुपये घेतले. त्यानंतर त्यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली. पैसे घेतल्यानंतर आपल्याला नोकरी दिली जात नाही. तसेच आरोपी सोबत कोणताही संपर्क होत नसल्याने अनिरुद्ध यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group