पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कृष्णा नगर चौक ते चरित चौक या मुख्य रस्त्यात असलेल्या मोकळ्या जागेत आज (दि.०८) एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महेश चामे (रा. नवचैतन्य सोसायटी चिखली, मुळगाव लातूर) असे वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला.
पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.०८) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चिखली पोलीसांना माहिती प्राप्त झाली की, कृष्णानगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्याच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असता, एक व्यक्ती मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले.

त्याबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता मयत व्यक्तीचे नाव महेश चामे असून रोडच्या साईडला मोबाईल स्क्रीन गार्ड बसविण्याचा तो व्यवसाय करत होता. मृत महेश चामे हा नवचैतन्य सोसायटी चिखली येथे सध्या वास्तव्यास होता, तसेच त्याचे मुळगाव लातूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून वार करून मारल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.























Join Our Whatsapp Group