पिंपरी (Pclive7.com):- देशातील प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात १५ लाख रूपये जमा करणार असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीच दिलं नव्हतं. तसेच भाजपच्या जाहिरनाम्यात देखील अशा प्रकारचं कधीच म्हटलं नव्हत. तर विरोधक आणि काँग्रेसनेच असा अपप्रचार केला असल्याचं वक्तव्य राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी केले आहे. एकीकडे विरोधक मोदींनी दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध करत आहेत. त्यातच आता खासदार साबळे यांनी मोदींच्या ‘त्या’ आश्वासनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा ४ वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा ४ वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने अनेक उपलब्धी परिपूर्ण व लोककल्याणकारी योजना राबिवल्या आहेत. याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड तर्फे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, शहर प्रवक्ते अमोल थोरात, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, बाबू नायर, प्रमोद निसळ यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
अनेक आश्वासने देऊन नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात सत्तेत आले. देशातील मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झालीत. अच्छे दिन येतील, महागाई कमी होईल, गरीबी दूर होईल, रोजगार उपलब्ध होतील. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात १५ लाख जमा होतील असं आश्वासन मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. मात्र गेल्या ४ वर्षात यातील एकही पूर्ण झालेलं नाही. मोदी सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा विरोधक सर्वत्र निषेध करत आहेत.
दरम्यान, खासदार अमर साबळे यांना १५ लाख बँक खात्यात जमा होतीलं असं मोदींनी आश्वासन दिलचं नसल्याचं म्हटलयं. तसेच विरोधक व काँग्रेसकडून असा खोटा प्रचार झाला असल्याचं त्यांनी म्हटलयं. साबळेंच्या या वक्तव्यांमुळे विरोधक आता चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झालीयं.






















Join Our Whatsapp Group